भरमसाठ डोनेशन देऊनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले असताना काही मराठी शाळा मात्र गुणवत्ता उंचावताना दिसत आहेत. नाममात्र शुल्क आणि त्या बदल्यात उच्च मूल्यांची शिदोरी आम्ही देत आहोत. नवतरुण पालकांनी मनाची कवाडे उघड़ी ठेऊन डोळसपणे मुलांसाठी शाळा निवडावी.*चेंबूर हायस्कूल मध्ये उभारले लघु विज्ञान केंद्र**मराठी शाळा बदलतेय रुप…….**होतेय आधुनिक आणि विज्ञान तंत्रस्नेही.*Facebook,WhatsApp, Instagram, YouTube वरील माझ्या मित्रपरिवारासमोर मुख्याध्यापकांच्या परवानगीने ही ध्वनि-चित्रफीत(video) प्रसारित करताना मला आनंद होत आहे.ही ध्वनि-चित्रफीत आहे चेंबूर हायस्कूल मधील एका आनंदसोहळ्याची.सेवासहयोग आणि SS&C GlobeOp च्या संयुक्त विद्यमाने 18 ऑगस्ट 2017 रोजी *लघुविज्ञान केंद्र* उभारले गेले. याशिवाय ग्रंथालयास *बालवाचनालय खजिना*, *laptop,प्रोजेक्टर, डिजिटल मायक्रोस्कोप,LCD* अशी सुमारे सव्वा तीन लाखांची मदत देण्यात आली आहे.*लघु विज्ञान केंद्र*~~~~~~~~~~विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, चिकित्सक वृत्ती जागृत व्हावी,कार्यकारण भाव लक्षात यावा या हेतूने अनेक लहान उपकरणे येथे आहेत. नेहरू सायन्स सेंटर ची आठवण करून देणारी ही प्रारूपे आहेत. ही साधने विद्यार्थ्यानी फ़क्त पहायची नाही तर हाताळयची देखील आहेत.*”Learning by doing*””कृतीतून स्वयं अध्ययन”विद्यार्थी येथे करतील. या केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी आणि पाहणी केल्यानंतर अशा 2 चाचणी (pre test & post test) होतील. यातून या केंद्राची उपयुक्तता आणि यशस्विता स्पष्ट होईल.*आवाहन*~~~~~~~’विज्ञान मेळावा’ आयोजनावेळेस हे केंद्र पालक आणि माजी विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापकांच्या परवानगीने खुले केले जाईल. जरूर भेट द्यावी.