चेंबूर एज्युकेशन सोसायटीचा इतिहास

स्वातंत्रपूर्व काळात चेंबूर मानखुर्द, तुर्भे, माहूल हा परिसर तसा खेडेगावाचाच . सामाजिक सुखसोयी तसेच दळणवळणाच्या सोयी तुटपुंज्या. अश्या स्थितीत हायस्कुल शिक्षणासाठी मुलांना सायन, कुर्ला, व दादर येथे जावे लागत असे. स्वातंत्र्य चळवळीतील लोकाग्रणी कै. वि. ना. पूरव आणि त्यांचे सहकारी आणि त्यांचे सहकारी कै. नारायणराव आचार्य, कै. केशव लक्ष्मण मेकल प्रधान कार्यवाह, कै. रामजीभाई पेथड, कै. शांताबाई आमरे, कै. भाऊराव चेंबूरकर, कै. भिकमचंद काळूराम जैन, कै. आबासाहेब सांडू, कै. ना.ल. लाड, कै. अर्जुन रघुजी शिंदे, श्री. केशवराव करंबळेकर (तिसरे कार्यवाह), कै. रामनाथ पाठारे (सभासदत्व प्रथम नोंद) इत्यादि सामाजिक आणि राजकीय चळवळीतील मंडळींच्या बरोबरच शिक्षण क्षेत्रातील कै. ना.म.नारळकर, मा. मुख्याध्यापक नूतन मराठी विद्यालय, पुणे या मंडळींच्या बरोबरच श्री. वसंतराव खानोलकर, मा वसंतराव प्रधान

भाऊ रानवडे, कै.सुमन कात्रे, श्री. भ.मा. पंत आदी मंडळींच्या सहकार्यातून 1954 साली इ.5 वी ते 9 वी. पर्यंतचे वर्ग द.कृ. सांडू ब्रदर्स कंपनीच्या आवारात सुरू करण्यात आले. गावकरी आणि शिक्षक यांच्या श्रमदनातून आणि विविध वास्तुरूपातील देणग्यातून शाळा उभी राहिली.