मंगळवार दिनांक ५ सप्टेंबर २०२३ रोजी हेडगेवार सभागृह येथे चेंबूर हायस्कूल आणि इनर व्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण पूरक गणेशमूर्ती कार्यशाळा
सकाळी १० ते ३ या वेळेत आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेस कलाशिक्षक मोहिते सर यांनी सुंदर बालगणेश मूर्ती बनवत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
५ वी ते १० वी चे निवडक ८६ विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते.
सर्व विद्यार्थ्यांनी आपली कला, कसब, कल्पनाशक्ती उपयोगात आणून विविध प्रकारच्या गणेशमूर्ती तयार केल्या.
मूर्ती तयार करण्यासाठी शाडूची माती व पूर्वतयारीसाठी लागणारी आर्थिक मदत इनर व्हील क्लब ने दिली आहे.
तसेच रंगकाम केलेल्या गणेश मूर्ती आणि मखर सजावट यातून सर्वोत्तम ५ विद्यार्थी निवडून त्यांना इनर व्हील क्लब तर्फे १२ सप्टेंबर रोजी पारितोषिके देण्यात आली.
सदर कार्यक्रमास इनर व्हील क्लब अध्यक्षा जयश्री चेंबूरकर व त्यांच्या सहकारी आणि शालेय समिती अध्यक्षा भूषणा पाठारे उपस्थित होत्या.
त्यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना तुळशीची रोपे देऊन सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम युवकसभा अंतर्गत निमंत्रक श्रीम अनिता लुगडे आणि श्री. कैलास सानप यांनी आयोजित केला.
मुख्याध्यापिका प्रभा चव्हाण मॅडम आणि अधिकारी वर्ग यांचे मार्गदर्शन कार्यशाळेस लाभले.