मंगळवार
दिनांक 22 जुलै 2025
चेंबूर हायस्कूलचे
शालांत गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा
दिनांक 22/ 7 /2025 मंगळवार या दिवशी शालांत गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे निवेदन श्री उमेश बागवे सर यांनी केले .
या कार्यक्रमासाठी शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीम.सुरेखाताई जैस्वाल*प्रमुख पाहुण्या म्हणून तर *शाळेच्या शालेय समितीच्या अध्यक्षा आदरणीय भूषणाताई पाठारे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभल्या.
शाळेचे माजी विद्यार्थी व देणगीदार डॉक्टर विकास श्रीधर सांडू हे ही कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री गुरुनाथ सागवेकर व शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती नम्रता अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवातीला प्रमुख पाहुण्या श्रीमती सुरेखाताई जसवाल यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले .
इयत्ता आठवी अ च्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत म्हटले. या गीतासाठी मार्गदर्शन श्रीमती काशीद मॅडम यांनी केले होते.
प्रस्तावना मुख्याध्यापक श्री सागवेकर सर यांनी केली. कार्यक्रमाच्या पाहुण्यांची ओळख श्रीमती नम्रता अधिकारी यांनी केली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या यांनी प्रथम मनोगत व्यक्त केले. त्यानंतर डॉक्टर विकास श्रीधर सांडू यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. हसत खेळत विद्यार्थ्यांना डॉक्टर विकास सांडू यांनी मार्गदर्शन केले. मराठी माध्यमाला असण्याचा न्यूनगंड बाळगू नका . आपण कुठेही कमी पडत नाही .चेंबूर हायस्कूल तुमच्याकडून तुमच्या उज्वल भविष्यासाठी उत्तम तयारी करून घेते असे सरांनी सांगितले.
यानंतर शालेय समितीच्या अध्यक्षा यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत नव्याने सुरू होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
बक्षीस समितीचे प्रमुख श्री मोर्डेकर सर यांनी प्रथम देणगीदारांची नावे व विद्यार्थ्यांना मिळणारी बक्षिसे यासंदर्भामध्ये माहिती सांगितली व विद्यार्थ्यास बक्षीसे देण्यास सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानण्याचे काम शिक्षक प्रतिनिधी श्रीमती धिमते मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.



