शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025
वृक्षवल्ली आम्हा सोयरे
हा वारसा रुजविण्यासाठी 18 जुलै 2025 रोजी,
विज्ञान मंडळ, निसर्ग मंडळ व युवक सभा यांच्या संयुक्त विद्यमाने सीड बॉल तयार करणे ही कार्यशाळा लायन्स क्लब ऑफ चेंबूर क्राऊन यांच्या मदतीने आयोजित करण्यात आली. यासाठी लायन्स क्लब च्या सदस्या जिल्हा प्रमुख श्रीमती सरोज शर्मा, अध्यक्ष श्रीमती भावनीत कौर, शाळेचे मुख्याध्यापक श्री सागवेकर सर, विज्ञान शिक्षिका श्रीमती धिमते या उपस्थित होत्या.
श्रीमती वेताळ यांनी उपस्थितांची ओळख करून दिली व स्वागत केले. श्री सागवेकर सर यांनी लायन्स क्लब ने उपलब्ध करून दिलेल्या साहित्यासाठी सदस्यांचे व उपस्थितांचे आभार मानले.
श्रीमती वेताळ व श्रीमती बागवे तसेच लायन्स क्लबच्या सदस्या श्रीमती गौरी यांनी सीड बॉल करण्यासाठी मुलांना मार्गदर्शन केले. खत मिश्रित माती, कोकोपीट तसेच सीडबॉलसाठी आणलेल्या सीड्स मुलांना देण्यात आल्या. मुलांना केलेल्या मार्गदर्शनानुसार मुलांनी योग्य प्रमाणात पाणी मिसळून त्यांचे सीड बॉल तयार केले. त्यांना दिलेल्या पूर्वसूचनेनुसार काही बिया त्यांनी आणल्या होत्या तसेच काही बिया श्रीमती वेताळ यांनी सुद्धा आणल्या. मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेले हे सीड बॉल्स त्यांना घरी देण्यात आले. अशी ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. यासाठी लायन्स क्लबच्या श्रीमती गौरी व आपल्या शाळेच्या श्रीमती खरे यांची विशेष मदत झाली. कलाशिक्षक श्री मोहिते यांच्या फलक लेखनाने कार्यक्रमास ठळकपणा जाणवला.
याच कार्यक्रमा अंतर्गत कापडी पिशव्या वापरून… Say NO plastic असा संदेश देण्यात आला.
पर्यावरण जागरूकता, निसर्गप्रेम, स्वनिर्मिती अशी मूल्य रुजण्यास हा कार्यक्रम नक्कीच पोषक ठरला.



