स्मार्ट टीव्ही उद्घाटन सोहळा

बुधवार
१६ जुलै २०२५
स्मार्ट टीव्ही उद्घाटन सोहळा

आज चेंबूर हायस्कूल मध्ये इनरव्हील क्लब ऑफ चेंबूर आणि योगविद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मिळालेल्या स्मार्ट टीव्ही चे उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्यासाठी शालेय समितीच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती भूषणाताई चंद्रशेखर पाठारे मॅडम खास उपस्थित होत्या.तसेच इनरव्हील क्लबच्या DC(District Chairman) श्रीमती लक्ष्मी सिंग, अध्यक्षा रितिका मॅडम, इनरव्हील क्लब चे सर्व सदस्य, योगविद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई च्या प्रतिनिधी अशिता दोशी आणि रिंकू मॅडमही उपस्थित होत्या.

इनरव्हील क्लबच्या रितिका मॅडम यांच्या प्रयत्नांमुळे योगविद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई यांनी या टीव्हीसाठी डोनेशन दिले आहे.

या सोहळ्यात रितिका मॅडमनी सर्वप्रथम आपल्या संस्थेच्या सर्व सदस्यांची ओळख करून दिली.नंतर संस्थेच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली .तसेच योगविद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई यांच्याविषयी व दोषी मॅडम व रिंकू मॅडम विषयीही माहिती सांगितली .त्यांनीच आपल्याला हा स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून दिला आहे . विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले…

चेंबूर हायस्कूलचे आदरणीय मुख्याध्यापक सागवेकर सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
श्रीम. भूषणाताई पाठारे मॅडम यांच्या हस्ते जिल्हाध्यक्षा, चेंबूर अध्यक्षा, आणि देणगीदार यांना पुष्पगुच्छ देण्यात आली .
इनरव्हील क्लब विषयी व शाळेशी असणारे त्यांचे नाते… गेल्या काही वर्षात त्यांनी शाळेला केलेली मदत याविषयी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना माहिती दिली….. व त्यांचे मनापासून आभार मानले.

इनरव्हील क्लब ऑफ चेंबूर आणि योगविद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई …. तसेच उद्घाटन सोहळ्यासाठी मदत केलेल्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रम पार पडला.