गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी फलिताधारित शिक्षण

बुधवार
दि. 13 ऑगस्ट 2025

चेंबूर हायस्कूल मधील शिक्षकांसाठी प्रशिक्षण :

गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी फलिताधारित शिक्षण
(Outcome based education for quality education)

चेंबूर सर्वंकष शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर अशोक चक्रदेव यांनी बीएड कॉलेजच्या कॉन्फरन्स कक्षात सकाळी 11.15 ते 1.15 … दोन तास माध्यमिक शिक्षकांसाठी एक अतिशय सुंदर कार्यशाळा घेतली.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आपण आपल्या अध्यापनात नेमका कोणता बदल करायचा… फलिताधारित शिक्षण म्हणजे काय… OBE, PO, CO, LO आणि त्यांचे अध्ययनातील महत्त्व उदाहरणासहित स्पष्ट केले. तसेच या सगळ्यासाठी रुब्रिक्स तयार करणे किती महत्त्वाचे आहे तेही स्पष्ट केले. रुब्रिक्स म्हणजे काय व ते कसे तयार करायचे त्याचे उदाहरणासहित प्रात्यक्षिक दाखवले.

शालेय समितीच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती भूषणाताई पाठारे याही प्रशिक्षणासाठी उपस्थित होत्या.

सरांनी घेतलेले सेशन सर्वांना खूप आवडले… सर्वांनी किमान एका टॉपिक वर रुबिक्स तयार करायचे असे ठरवून प्रशिक्षणाची सांगता झाली. शेवटी सर्वांच्या वतीने चेंबूर हायस्कूलच्या पर्यवेक्षिका श्रीमती अधिकारी मॅडम यांनी सरांचे आभार मानले.