स्वातंत्र्य दिन 2025

शुक्रवार
दिनांक 15 ऑगस्ट 2025
स्वातंत्र्य दिन

चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे सर्व घटक विभाग मिळून स्वातंत्र्याचा 79 वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट 2025 मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला .

यावर्षी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी आणि निवृत्त कर्नल माननीय श्री विनायक वसंत देशपांडे.
चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री विनोदजी सदानंद शेणोय यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले.

चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष माननीय श्री सुधीरजी दिगंबर आपटे, उपाध्यक्ष श्री गिरीशजी अनंत देशपांडे ,शालेय समितीच्या अध्यक्षा आदरणीय भूषणाताई चंद्रशेखर पाठारे ,संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी ,सर्व घटक विभागांचे घटक प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक वर्ग आणि माजी विद्यार्थी ही उपस्थित होते.

सर्वप्रथम आदरणीय पाहुणे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते भारत मातेची पूजन करण्यात आले. नंतर पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण ध्वजवंदन व ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व मानवंदना झाली.

त्यानंतर चेंबूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यगीत, झेंडागीत व शिट्टीच्या तालावर कवायत सादर केली. कवायती नंतर सर्व घटक विभागांनी देशभक्तीपर गीते सादर केली.
यावर्षी प्रथमत:च संस्थेतर्फे सर्व घटक विभागातील शिक्षकांच्या गटांची देशभक्तीपर समूहगान स्पर्धा घेण्यात आली. सर्व घटक संस्थांनी उत्तम समूहगीते सादर केली.

चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष माननीय श्री सुधीरजी आपटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष माननीय श्री गिरीशजी देशपांडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. अध्यक्ष माननीय श्री विनोदजी शेणोय यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण, प्रमुख पाहुणे निवृत्त कर्नल माननीय श्री विनायक वसंत देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सैनिक भरती, सैनिकी जीवन ,त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याविषयीची माहिती देऊन मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात माननीय विनोदजी शेणोय यांनी इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्व व नंतर भारताची केलेली अधोगती व निर्माण झालेला प्रांतवाद व भाषावाद याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यानंतर सर्व घटक विभागांच्या झालेल्या समूहगान स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. सर्वांचेच कौतुक करण्यात आले.

चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे सदस्य माननीय श्री चंद्रशेखर सुरेंद्रनाथ पाठारे सर यांनी सुंदर, सुरेल असे बलसागर भारत होवो या गाण्याची झलक सादर करीत सर्वांचे आभार मानले.

अशा प्रकारे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारताचा स्वातंत्र्य दिन जल्लोषात व उत्साहात साजरा झाला.