बुधवार
16 जुलै 2025
” एक पेड मा के नाम” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना रोपवाटप.
हिरवी झाडे हिरव्या वेली
पान फुलावर प्रेम करा
ही तर आपली मित्रमंडळी
नित्य तुम्ही हे ध्यानी धरा
हा संदेश रुजवण्यासाठी 16 जुलै 2025 या दिवशी विज्ञान मंडळ, निसर्ग मंडळ आणि युवकसभेअंतर्गत रोप वाटप करण्यात आले.
‘एक पेड माँ के नाम ‘ या उपक्रमांतर्ग कार्यक्रम आयोजित केला होता.
शाळेचे मुख्याध्यापक श्री सागवेकर सर, पर्यवेक्षिका श्रीम. अधिकारी मॅडम आणि विशेष अतिथी डॉ.श्री उमाकांत देशमुख सर (प्राध्यापक चेंबूर सर्वकष )उपस्थित होते.
श्री सागवेकर सरांनी झाडांचे महत्व समजावून सांगितले.
श्री देशमुख सरांनी मुलांकडून छोटं गाणं म्हणून घेतलं आणि त्यातूनच सुंदर संदेश दिला.
त्यानंतर रोपांचे वाटप करण्यात आले.
माजी नगरसेवक श्री शिगवण यांच्या सहकार्याने शाळेचे लिपिक श्री राजेश ठाकूर सर यांनी रोपे उपलब्ध करून दिली.
त्या बद्दल त्यांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप झाला.



