पर्यावरण समतोलासाठी प्राण्यांशी मैत्री करा!
सर्पमित्र सुनील कदम
जीवन तांबे
चेंबूर, ता. 22 (बातमीदार) :
आजच्या मोबाईल युगात विद्यार्थ्यांचे प्राण्यांशी नाते दुरावत चालले आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनो, प्राण्यांशी मैत्री करा आणि पर्यावरणाचा समतोल साधा, असे आवाहन सर्पमित्र सुनील कदम यांनी केले.
सकाळ ‘एनआयई व चेम्बूर एज्युकेशन सोसायटीचे चेंबूर हायस्कूल आयोजित
नागपंचमी निमित चेंबूर हायस्कूल मधील स्वामी विवेकानंद सभागृहात सोमवारी ( ता. 21 ) ‘करूया मैत्री प्राण्यांची’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्राण्यांचे महत्त्व पटवून दिले. ‘पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येक प्राणिमात्राची गरज असते. ही निसर्गाची अन्नसाखळी आहे. सृष्टीतील एक जीव जरी नष्ट झाला तर त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो.
पूर्ण जगात एकूण 2500 सापाच्या जाती असून त्यातील भारत देशात एकूण 252 सापाच्या जाती आढळतात. सर्वात जाती सापाच्या जाती उत्तरप्रदेश राज्यात आढळतात. कोणत्याही प्राणी व सापाना मारू नका. त्यांना जीवदान दया. मोठ्या जंगलात सोडा. त्यांना जगु दया. त्यांना मुक्त संचार करू द्यात असे सर्पमित्र सुनील कदम यांनी महत्व सांगितले.
प्राण्यांशी गट्टी
विषारी – बिनविषारी साप, बदक, बेडूक, फायटर मासा, उंदीर, ससा, गिनिपिग, अमेरिकन चिंकी, मोरपंखी कबूतर, घार, अमेरिकन इग्वाना, मांजर आदी प्राणी प्रत्यक्षात पाहून सुरुवातीला विद्यार्थी थोडेसे घाबरले.
पण सुनील कदम यांनी त्यांच्याशी संवाद साधून
प्राणी त्यांच्याकड़े देऊन त्यांची भीती घालवली. काही मिनिटांतच विद्यार्थ्यांची प्राण्यांशी गट्टी झाली. काही विद्यार्थ्यांनी तर प्राण्यांना हाताळायला दिले.
याचा अनोखा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. धीर चेपलेले विद्यार्थी प्राणीविश्वात हरवून गेले होते.
पर्यावरण आणि प्राण्यांशी सतत मैत्री केली पाहिजे, असा मोलाचा सल्ला कदम यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवकसभा निमंत्रक अनिता लुगडे यांनी व आभार प्रदर्शन रेखा धीमते यांनी केले.
चेंबूर एज्यु सोसायटीचे चेंबूर हायस्कूलचे प्रधान कार्यवाह जितेंद्र म्हात्रे, चेंबूर हायस्कूल मुख्याध्यापिका प्रभा चव्हाण, शालेय समिती अध्यक्षा भूषणा पाठारे, संगणक सादरीकरण सहाय्य मच्छिंद्र मानाजी, वर्गशिक्षका वैशाली वेताळ, वैभवी बागवे, शिक्षक वर्ग, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.