पितृ संमेलन

शनिवार दिनांक २२ऑगस्ट २०२६ रोजी बालवर्ग ते इयत्ता चौथी प्राथमिक विभागातील पुरुष पालकांसाठी “एक उनाड दिवस” या शीर्षकाखाली पितृसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर संमेलनास अध्यक्ष म्हणून मान. मुख्याध्यापक श्री विठ्ठल दुधाप्पा कांबळे व उद्घाटक म्हणून मान. श्री गणेश खणकर व रमेशजी ओवळेकर उपस्थित होते.
शाळा आणि पालक यांच्यातील संवाद अधिक दृढ होणे तसेच खेळ व मनोरंजनाच्या माध्यमातून पालकांचा सहभाग वाढविणे सोबतच भावनिक , सामाजिक विकास याबाबत विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी सदर पितृ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनामध्ये क्रिकेट, कबड्डी, रस्सीखेच, चित्रकला असे विविध खेळ व छंद यांचा बहुसंख्य पालकांनी आनंद घेतला.