गुरुवार दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मान.श्री.विठ्ठल दुधाप्पा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक विभागात “रक्षाबंधन कार्यक्रम” उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेम ,बंधुभाव, परस्पर आदर, सामाजिक बांधिलकी आणि संस्कृती परंपरेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले .तसेच विद्यार्थ्यांकडून राखी तयार करून घेणे ,राखीचे चित्र काढणे, एकमेकांना राखी बांधणे असे विविध उपक्रम घेण्यात आले.
आपली संस्कृती ,परंपरा यांसारखी सामाजिक मूल्यांची जपणूक व्हावी यासाठी दरवर्षी शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थी चेंबूर नाका परिसरातील अनेक सामाजिक घटक संस्थांना भेट देऊन व तेथील उपस्थित मान्यवर सदस्यांना राखी बांधून हा कार्यक्रम साजरा करतात.
“राखीचा धागा छोटा असला, तरी त्यात प्रेम विश्वास आणि जिव्हाळ्याचे बंध घट्ट विणलेले असतात.”



