देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांच्या मनावर लहानपणापासून बिंबवण्यासाठी राष्ट्रपुरुषांच्या कार्याची ओळख होण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सभाधीटपणा हे गुण रुजवण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ रोजी चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विभागात माननीय मुख्याध्यापक श्री. विठ्ठल दुधाप्पा कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या प्रत्येक इयत्तेतून गुणानुक्रमे तीन विद्यार्थी निवडण्यात येतात. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवर परीक्षकांच्या हस्ते गोष्टीची पुस्तके देऊन गौरविण्यात आले .


