खेळ श्रावणातले कार्यक्रम

“खेळ श्रावणातले” हा श्रावण महिन्याच्या पारंपारिक संस्कृती, उत्साह आणि आनंदाशी जोडलेला सुंदर उपक्रम चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत मंगळवार दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी अतिशय आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मान.डॉ. मंजू मंगलप्रभात लोढा (कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या) व अध्यक्ष म्हणून चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या शालेय समिती अध्यक्षा मान. डॉ. श्रीमती नूतन खलप, शाळेचे मुख्याध्यापक मान.श्री. विठ्ठल दुधाप्पा कांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
महिला पालकांना मोबाईल व डिजिटल जगापासून थोडा विरंगुळा म्हणून स्वामी विवेकानंद सभागृहात फुगडी, झिम्मा,घुमर अशा विविध पारंपारिक खेळांचा आनंद शाळेतील महिला पालकांनी लुटला.