श्री हरिहर पुत्र भजन समाज आयोजित संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धा

श्री हरिहर पुत्र भजन समाज ही मुंबईतील एक अत्यंत प्रतिष्ठित ,अग्रगण्य सामाजिक ,सांस्कृतिक आणि अध्यात्मिक संस्था आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धा घेण्यात येते.
यावर्षी शनिवार दिनांक5 सप्टेंबर 2026 रोजी ‘श्री महालक्ष्मी अष्टकम’ व ‘श्री शिवपंचाक्षरी स्तोत्र’ पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये आपल्या चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विभागातील सहा विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये इयत्ता दुसरीमधून कुमारी सान्वी संजय ठाकूर व इयत्ता चौथीमधून कुमारी सिद्धी भाबड या दोन विद्यार्थिनींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.
तदनंतर रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी घेण्यात आलेल्या अंतिम फेरीत कुमारी सान्वी संजय ठाकूर या विद्यार्थिनीने शिवपंचाक्षरी स्तोत्र पाठांतर स्पर्धेत चौथा क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले.