शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर 2026 रोजी चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागात अत्यंत उत्साहात , आनंदात आणि पारंपरिक वातावरणात दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्ण, राधा आणि गोप-गोपिकांचे आकर्षक व सुंदर वेश परिधान केले होते.
चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मान्यवर सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक ,मान्यवर पाहुणे आणि पालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला. ‘गोविंदा आला रे आला’म्हणत शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या पथकाने सुरक्षित अंतरावर व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मानवी मनोरे रचून आनंदाने दहीहंडी फोडली. लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांवर विश्वास, सहकार्य आणि टीमवर्कची भावना रुजून आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून दरवर्षी आनंदाने आणि जल्लोषात दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो.



