नको तिला हार तुरे… फक्त प्रेमळ संवाद हवा…
हा प्रेमळ संवाद घडवून आणला आमच्या संस्थेने…चेंबूर एज्युकेशन सोसायटीने… जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत…
संस्थेच्या पदाधिकारी श्रीम. भूषणा पाठारे, डॉ. नूतन खलप आणि चेतना कोरगावकर मॅडम यांच्या त्रिवेणी नेतृत्वाखाली आज आम्ही महिला दिन उत्साहात साजरा केला.
संस्थेच्या विविध घटक संस्थेच्या महिला यानिमित्ताने एका सूत्रात गुंफल्या गेल्या.
आम्ही नाचलो , गायलो, खेळलो , जेवलो, डौलाने चाललो , हरलो , जिंकलो …आणि खळखळून हसलो…
आमच्या पदाची झुल उतरवत आम्ही सभागृहात प्रवेश केला.
तिथे आमचे स्वागत करायला स्वतः भूषणा ताई, नूतन ताई, चेतना ताई हजर होत्या… शुभेच्छांसह पेन आणि चॉकलेट भेट देत, त्यांनी आम्हाला आमची bucket list लिहायला चिठ्ठी दिली. इथून आमच्या ‘स्व’ ला जागे करत आमची ईच्छा पेटी कडे सुपूर्द केली.
Ice breaking करत आमचे ग्रुप तयार केले गेले.
भूषणा ताई आणि नूतन ताई आमच्याच शाळेच्या माजी विद्यार्थिनी. त्यांच्या वेळेस जी निकेतने होती त्याची नावे त्यांनी आमच्या ४ गटांना दिली…
स्फूर्ती, प्रेरणा, ज्योती, किर्ती…
या गटांमध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, डीएड कॉलेज, बीएड कॉलेज मधील आम्ही सर्व महिला कर्मचारी एकत्रित झालो होतो.
अंताक्षरी, ramp walk, नृत्य, प्रश्न मंजुषा, mind games… असे अनेक खेळ खेळलो.
हरलो, जिंकलो, धडपडलो…
छान सुग्रास जेवणाचा आनंद घेतला. मैत्रिणींच्या bucket list जाणून घेतल्या. बलस्थाने ओळखली. बक्षिसे मिळवली. आमची मनोगते व्यक्त केली…
आणि आम्हाला सर्वांना सुंदर कर्णफुले भेट म्हणून मिळाली…आनंद द्विगुणित झाला.
हा कार्यक्रम आमच्या मूळ वास्तूत असल्याने भावनिक झालो…
या वास्तूने आम्हाला पुन्हा एकदा आपल्या प्रेमळ पंखाखाली घेतले. जिने आम्हाला माहेर दिले, स्थैर्य दिले, संपत्ती दिली, सन्मान दिला ती आमची मूळ वास्तू पुन्हा एकदा दिमाखात उभी राहूदे हीच सदिच्छा सर्वांच्या मनात होती.
वास्तू तथास्तु म्हणत असते म्हणतात.
हे स्वप्न लवकरच सत्यात येवो
भूषणा ताई, नूतन ताई, चेतना ताई…खूप खूप धन्यवाद